आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र
गोंदिया: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विधी सेवा महाशिबीर' व 'शासकीय योजनांच्या महामेळाव्यात' ‘अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान’ अंतर्गत सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिराचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती आणि जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सिकलसेल मुक्त समाजासाठी जनजागृतीचे आवाहन केले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायमूर्ती श्री. ए. एस. किलोर आणि माननीय न्यायमूर्ती श्री. एम. डब्लू. चांदवाणी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री. आर. एन. जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरुगानंथम एम. (IAS), पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS), अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. एम. जे. जी. मुल्ला, आणि विभागीय वन अधिकारी (DFO) श्री. पवनकुमार जोंग यांनी शिबिराला भेट देऊन मोहिमेचे कौतुक केले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. श्री. टी. बी. कटरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. नरेश के. वाळके यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
आरोग्य विभागाचा पुढाकार
सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष स्टॉल लावला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी उपस्थित मान्यवरांना 'अरुणोदय अभियाना'ची व्याप्ती आणि सिकलसेल निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोडपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल आणि जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे, डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कार्य केले.
जनजागृती आणि तपासणी
शिबिरादरम्यान नागरिकांना सिकलसेल म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि लग्नापूर्वी कुंडलीऐवजी 'सिकलसेल कार्ड' जुळवणे किती महत्त्वाचे आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.
समुपदेशन: निशा डहाके (समुपदेशिका) आणि स्वप्ना खंडाईत (सिकलसेल समन्वयक) यांनी रुग्णांचे समुपदेशन केले.
समन्वय: आय.ई.सी (IEC) विभागाचे प्रशांत खरात, सुरेंद्र पारधी आणि निकिता शरणागत यांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.