कारंजा येथे योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कारंजा येथे योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालातर्फे शनिवारी (ता. १) कारंजा येथील जि.प. शाळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे शुभारंभमहाविद्यालयाचे प्रा. आनंदकुमार पटलेयांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून सरपंच नोकचंद कापसे, मुख्याध्यापक घाईवड, योग शिक्षिका कांबळे, लिल्हारे, पौर्णिमा मानकर, चेतन डोलारे, निर्भय डोलारे, माजी सैनिक चंद्रशेखर भोंडेकर, हजारे, बघेले, बडवाईक, चौरसिया, रहांगडाले, रुद्रकार, बन्नोटे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
योग हा जीवनातील अभिन्न उपक्रम आहे. दररोज योग क्रिया
केल्याने मानवाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहत असते. ग्रामीण भागातील नागरीकांना व शालेय विद्यार्थ्यांना योगाचे महत्व विशारद व्हावे म्हणून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रा. आनंदकुमार पटले यांनी योगावर मार्गदर्शन केले. योग शिबिराच्या यशस्वीतेसाठी रूपा बिसेन, विकास बावनथडे, सतीश वालदे, साक्षी राऊत, सेजल साखरवाडे, शीला कोरोटे, अमित वालदे, शीतल मरसकोल्हे, संगीता गात्रे, वर्षा गावड, वैशाली पटले, स्मृती चौधरी, योगिता बैस, काजोल करवाडे, तिलांजली करसाल, वर्षा मेंढे, रिकी हिडामी, विकास कोराम यांनी सहकार्य केले. शाळेतील विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.