पोलिस होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! १५,६३१ पदांसाठी भरती; या दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया*लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क 
🔰 _पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 15 हजार 631 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आता यासाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे._

👉 _पोलिस भरतीची अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे._
👉 _या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचीत शक्यता._
👉 _मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे._
👉 _लेखी परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते_

_*वयोमर्यादेत नसलेल्यांनाही एक संधी*_
▪️ _या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे._

▪️ _याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही नामी संधी आहे._

_*भरण्यात येणारी पदांची संख्या*_
- पोलीस शिपाई - 10 हजार 908
- पोलीस शिपाई चालक - 234
- बॅण्डस् मॅन - 25
- सशस्त्री पोलीस शिपाई - 2,393
- कारागृह शिपाई - 554

_*कशी होणार निवड*_
▪️मैदानी चाचणी
▪️मैदानी चाचणीत ४० टक्के गुण अनिवार्य
▪️लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवारांची निवड
▪️लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न
▪️मुंबई सोडून राज्यभरात एकाचवेळी होणार लेखी परीक्षा

_*ठळक बाबी...*_
👉 _सुरवातीला उमेदवारांची होणार मैदानी चाचणी_
👉 _मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक_
👉 _लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवारांची होणार निवड_
👉 _लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, सामान्यज्ञान व चालू घडामोडींवर असतात वस्तुनिष्ठ प्रश्न_
👉 _मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी होईल लेखी परीक्षा; एका उमेदवारास एका पदासाठी एकाच जिल्ह्यात करता येईल अर्ज