होत्याच नव्हतं झालं, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू *अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला*लोकप्रतिनिधी दिवाळी मिलन व निवडणुकीच्या रणनीती आखण्यात व्यस्तलोकशाही एक्सप्रेस गोंदिया

       लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
 दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. धानाच्या कडप्पा सक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची  मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हातात आलेले पीक हिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणनीती आखून भेटीगाठी व दिवाळी मिलनात व्यस्त दिसून आहेत.
   खरीप पीक अंतिम टप्यात असताना 24 व 25 ऑक्टोबरला अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांनी पुंजने तयार केले काहीनी कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी धान सुकविण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेत पसरविले.  आलेल्या  पावसामुळे कापणी केलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव व अन्य तालुक्यातील अनेक भागात नुकसान झाले आहे. शेतशिवारात अनेक शेतकऱ्यासोबत भेट दिली असता विदारक परिस्थिती दिसून आली. एकीकडे कर्ज काढून शेतीचा हंगाम करणाऱ्या शेतकऱ्यावर उभे झालेले आसमानी संकट आर्थिक विवेंचनात भर पाडणारे असून जगावे की मरावे या विवेंचनात शेतकरी सापडला आहे. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त धान पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी दिवाळी मिलन व आगामी होणाऱ्या नगरपरिषद, नगर पंचायत  व गट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व भेटीगाठीत व्यस्त दिसून आहेत.