एसीबी ची कार्यवाही, लाच स्वीकारली नाही, मात्र फायद्यासाठी केली होती लाचेची मागणी. लोकशाही एक्सप्रेस गोंदिया

     लोकशाही एक्सप्रेस गोंदिया 
पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या फायद्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यावर नागपूर एसीबी ने कार्यवाही केली आहे .ही कार्यवाही 28 ऑक्टोंबर रोजी गोंदिया सहायक निबंधक कार्यालय येथे करण्यात आली. ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे त्या अधिकाऱ्याचे नाव संतोष सुदाम रोकडे वय 56 वर्ष असे आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवुन तक्रार नोंदविली की, त्यांचा मासेमारी व्यवसाय असुन त्यांनी ईटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. रामनगर रजी. नं. ६६८ या संस्थेसोबत उत्पादित मासे खरेदी विक्रीचा करारनामा केला. सदर करारनामा कालावधी २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे. काही कारणास्तव संस्थेने सदर करारनामा मुदतपुर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे तक्रार केली. सदर तक्रारीवर चौकशी करण्याकरीता श्री. सुदाम लक्ष्मण रोकडे, वय ५६ वर्ष, धंदा-नौकरी (पद-सहायक निबंधक), वर्ग-२, सहकारी संस्था गोंदिया, अतिरीक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा यांनी रु. १,००,०००/- ची मागणी केली. सदर लाच मागणीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर च्या पथकाने दि. ०९/१०/२०२५, दि. १६/१०/२०२५ व दि. २७/१०/२०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान आलोसे सुदाम रोकडे यांनी तक्रारीची चौकशी करण्याकरीता रु. १,००,०००/- ची मागणी करुन त्यातील पहिला हप्ता रु. २५,०००/- पैकी रु. २२,०००/- लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. दि. २८/१०/२०२५ रोजी लाचेची सापळा आजमावणी केली असता, संशय आल्याने आलोसे यांनी मागणी केल्या प्रमाणे लाच रक्कम स्विकारली नाही.
नमुद लोकसेवक यांनी आपले पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता लाच रक्कमेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान पोलीस अधिक्षक, श्रीमती माधुरी बाविस्कर अपर पोलीस अधिक्षक, श्री. विजय माहुलकर अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल जिट्टावार पोलीस उपअधिक्षक, श्री. जितेंद्र वैरागडे पोलीस निरीक्षक, श्री. राजकिरण येवले पोलीस निरीक्षक, म. पोहवा. अश्मिता भगत, पो.शि. हेमराज गांजरे, पो.शि. होमेश्वर वाईलकर, प्रफुल भातुलकर, चा. पोशि. राजेंद्र जांभुळकर सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर यांनी केली आहे.
सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, कोणत्याही शासकिय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसम यांनी कोणतेही शासकिय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फि व्यतरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर येथे संपर्क साधावा.