आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेतल्या जात असून प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी भाजपा नेत्या आमदार चित्रा वाघ गोरेगाव दौऱ्यावर असणार आहेत. भाजपाकडून गोरेगाव नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक या पदाकरिता उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथील गुरुकृपा लॉन मध्ये विजय संकल्प सभा व प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचार सभेसाठी प्रामुख्याने भाजपा नेत्या व आमदार चित्रा वाघ हे येणार असून त्यांच्या या प्रचार सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.