लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
गोरेगाव तहसील कार्यालय अंतर्गत साजा क्रमांक सात गोरेगाव येथील अरविंद यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कार्यवाही ४ नोव्हेंबर २०२५ ला करण्यात आली आहे या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खडबड उडाली
अशाप्रकारे आहे प्रकरण
*लाच मागणी कारवाई अहवाल*
१) **ला.प्र.वि. घटकः* - गोंदिया
२) *तक्रारदारः* - पुरूष, वय 36 वर्षे, रा. गोरेगाव जिल्हा गोंदिया.
३) *फिर्यादीः* - सरकारतर्फे - श्री उमाकांत उगले ,पोलीस निरीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया.
४) *आरोपीः* -
श्री अरविंद कुमार युवराज डहाट, वय 43 वर्ष, पद : ग्राम महसूल अधिकारी गोरेगाव, साजा क्रमांक 08 ,गोरेगाव, जिल्हा गोंदिया
मूळ/सध्याचा पत्ता
रा.: कुंभारे नगर, नाना चौक समोर गोंदिया, तालुका जिल्हा गोंदिया
5) *तक्रारः* दि 27/10/2025 रोजी तकारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे गोरेगाव येथील गट क्रमांक 1004/ 4 मध्ये असलेल्या पडीत जमिनीपैकी 305.50 चौरस मीटर जागा अकृषिक विकासात्मक परवानगी मिळण्याकरता मौका चौकशी करून तहसील कार्यालय गोरेगाव येथे चौकशी अहवाल पाठविण्याकरता आलोसे 15000 रुपये लाचेची मागणी केलेबाबत तक्रार प्राप्त झाली.
६) *पडताळणीः* -दिनांक 27/10/2025 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, तक्रारदार यांचे प्लॉटची मौका चौकशी करून तहसील कार्यालय गोरेगाव येथे चौकशी अहवाल पाठवण्याकरता 15000/ रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 14000/ रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे.
असा रचण्यात आला सापळा
दिनांक 27.10 . 2025 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवकाने, लाच रक्कम न स्वीकारता "बाबा को लेके आता हू असे म्हणून निघून गेले. त्यानंतर आलोसे कार्यालयात हजर न आल्यामुळे सापळा कारवाई करता आली नाही.
दिनांक 4 . 11. 2025 रोजी तक्रारदार यांनी लाप्रवी कार्यालय गोंदिया येथे येऊन कळवले की, आलोसे यांना माझा संशय आल्यामुळे ते कार्यालयात हजर येत नाहीत ते आता माझ्याकडून लाच रक्कम स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर पुढील कारवाई करावी .
८) *आरोपीची अंगझडती* रियलमी कंपनीचा मॉडेल क्रमांक 15 X 5G कंपनीचा मोबाईल इ. किमती 5000/-
९) *मोबाईल जप्तीः-*
मोबाईल हॅन्डसेट तपासणी करून आवश्यकता असल्यास जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे.
१०) *आरोपीची घरझडतीः-* आरोपीची घरझडती चालू असून वेगळा अहवाल पाठवत आहोत.
११) *गुन्हा रजि. नं कलम
पोस्टे जिल्हा* :-
आरोपीविरुद्ध पोलीस
स्टेशन गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे कलम 7 भ्र.प्र. अधि. 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे..
१२) *गुन्हा दाखल तारीख व वेळ* गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१३) *आरोपी अटक दिनांक व वेळ -* आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात येत आहे.
१४) *सापळा अधिकारीः-*
श्री उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया.
१५) *पर्यवेक्षक अधिकारी :
उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक लाप्रवी. गोंदिया