नगरपंचायत निवडणूकीत ८ हजार ६५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
-------------------------------------
गोरेगाव ता ०६|११:-
नगरपंचायत निवडणूकीत ८हजार ६५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असुन निवडणुकी दरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहीतेचे
पालन करावे असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी गुरुवार (ता ०६) नगरपंचायत येथील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी मुख्याधीकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय परदेशी उपस्थित होते.
या निवडणूकीत १७ प्रभाग असून शहीद जान्या तिम्या हायस्कूल येथे १७ मतदान केंद्र राहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रज्ञा भोकरे व दोन सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अक्षय परदेशी,नायब तहसीलदार राजश्री मलेवार राहणार असून जवळपास ९० कर्मचारी निवडणूकीत सहभागी होऊन निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करणार आहेत.
उमेदवारी नाम निर्देशन अर्ज १० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत.ऑनलाईन अर्ज करुन त्या अर्जाची हार्ड काॅफी निवडणूक अधिका-याकडे रितसर जमा करावी लागणार आहे.अर्जाची छाननी १८नोव्हेबर सकाळी १० वाजेपासून होणार आहे.अर्ज मागे १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरपर्यत घेता येणार आहेत. मतदान २ डिसेंबर व मतमोजणी ,निकाल घोषित ३ डिसेंबर ला होणार असल्याची माहीती तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी दिली.
====================
