लोकशाही एक्सप्रेस गोंदिया
गोंदिया: सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक गट-क ही पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दि.5 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्याकरीता अर्ज भरण्याची मुदतवाढ दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत देण्यात आली आहे, असे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे