राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायती ची निवडणूक सुरू झाली असून गोरेगाव नगरपंचायत ची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. अशातच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणारे अजय कोठेवार यांनी भाजपात प्रवेश करून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला. भाजपने अजय कोठेवारला गोरेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा घोषित केले आहे. अजय काठेवार हे भाजपात गेल्याने काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचेही बोलले जात आहे. अजय कोठेवार मुळे भाजपाला फायदा होणार की,काँग्रेसला नुकसान होणार हे निवडणुकी नंतरच बघण्यास मिळणार आहे.
कोण आहेत अजय कोठेवार
शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध स्व. सदाशिवराव कोठेवार यांचे अजय कोठेवार हे पुत्र आहेत. वडिलाप्रमाणेच अजय कोठेवार यांच्या अंगी लहानपणापासूनच राजकारणीचे गुण आहेत. अखिल भारतीय विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षापर्यंत त्यांनी काम सांभाळले. आदिवासी हलबा हलबी समाज सामुहिक सोहळ्याचे सचिव , त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातही त्यांना मोठे पद देण्यात आले होते .ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनचे सुद्धा त्यांनी सचिव पद सांभाळलेले आहे. अजय कोठेवार यांची पत्रकार क्षेत्रातही चांगली ओळख आहे. कृषी मत, नागपूर पत्रिका, जनवाद व विभिन्न वृत्तपत्रात त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे , राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात त्यांची चांगली छाप आहे. त्यांनी शिक्षक पदाची ही धुरा सांभाळली.त्यानंतर 2014 पासून ते शासकीय सेवेत रजू झाले .त्यामुळे प्रशासनाचा ही मोठा अनुभव अजय कोठेवार यांना आहे. याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टीला होणार असल्याचे बोलले जात आहे.
पिंडकेपार मध्यम प्रकल्पाला विरोध
गोंदिया तालुक्यातील पिंडकेपार मध्यम प्रकल्पाला जेव्हा १९८३- ८४ मध्ये मंजुरी मिळाली त्यावेळेस सदाशिव कोठेवार यांनी विरोध करीत शासनाच्या विरोधात पिंडकेपार मध्यम प्रकल्पाच्या जागेवर जाऊन आंदोलन केले होते. शासनाने सदाशिव कोठेवार यांना अटक केली होती त्या वेळेस अजय कोठेवार हे वर्ग चौथी मध्ये शिक्षण घेत होते आपल्या वडिलांची मागणी जनहिताची आहे हे ओळखून स्वतः अजय काठेवार यांनी वानर सेना म्हणून मध्यम प्रकल्पाच्या पाळीवर आंदोलन केले होते. हे आंदोलन त्यावेळी वानर सेना म्हणून चांगलेच गाजले होते. विशेष म्हणजे पिंडकेपार मध्यम प्रकल्पाची फाईल सध्या तरी बंद अवस्थेत आहे.
12 नोव्हेंबरला घेतला भाजपात प्रवेश
अजय कोठेवार यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत 12 नोव्हेंबरला गोरेगाव येथे आयोजित भाजपच्या एका कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यासोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत महेंद्र कृपाल ,पवन न्यायकरे, कविताताई कृपाल ,अजय चाचेरे, अजय धमगाये,धर्मेंद्र राऊत, उमेश राऊत, दिलीप चव्हाण, अभिजीत मेश्राम, प्रणय सांगोडे ,मनोज चौधरी , खेमेद्र सोनवणे ,घनश्याम वाघमारे, पुरुषोत्तम अगळे, विश्वजीत वाघमारे, ज्योतीताई धमगाये यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष,आजी माझी आमदार व वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.