युवा पिढीने अधिका अधिक वेळ ग्रंथालयात येऊन वाचन करावे -- जे डी जगनीत गुरूजी

    आदि भारत। गोंदिया (महाराष्ट्र)
गोरेगांव तालुक्यातील ग्रंथमित्र वाय डी चौरागडे गुरूजी यांनी ग्रामीण भागातील मोहाडी येथे २ ऑक्टोबर १९८१ ला आदर्श सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून शिक्षणाचे द्वार उघडले आज या ग्रंथालयाला ४६ वर्षे होत आहेत लहानशा खोलीत सुरू झालेली वाचनालय हि आज तीस हजार ग्रंथ संख्या असुन १५० च्या जवळपास दैनिके,मासिके येत आहेत व तालुका अ दर्जा प्राप्त ग्रंथालय असुन ग्रामीण भागातील जिल्हात सर्वात मोठी ग्रंथालय आहे या ग्रंथालयाची स्थापना ग्रंथमित्र वाय डी चौरागडे गुरूजी यांनी केले आज त्यांची जयंती साजरी करित आहोत त्यांना विनम्र अभिवादन करून प्रत्येक व्यक्तींनी ग्रंथाचे वाचन करावे व आपल्या पाल्यांना सुध्दा जास्तीत जास्त ग्रंथ वाचनाची सवय लागावी यासाठी प्रयत्न करावे व युवा पिढीने अधिका अधिक वेळ हा ग्रंथालयात येऊन ग्रंथाचे वाचन करून येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य जे डी जगनीत गुरूजी यांनी आदर्श सार्वजनिक वाचनालय च्या जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी केले 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी सार्वजनिक वाचनालय गौरीटोला चे सचिव एल पी रांहागडाले गुरूजी होते प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्य डि आर चौरागडे, प्राचार्य राजेंद्र रहमतकर, सेवानिवृत्त शिक्षक भुषणराव कावळे, पोलिस पाटील राजेश येळे,तंन्टामुक्त समितीचे अध्यक्ष लिखीराम बघेले, मुख्याध्यापक डि व्ही बिसेन, सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे,माजी उपसरपंच श्रीराम पारधी संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, उपाध्यक्ष जे जे पटले गुरूजी, सचिव सुभाष चौरागडे, सदस्य वाय एफ पटले सर, हिरालाल महाजन, चंन्द्रकुमार चौरागडे, कमलेश पटले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य प्रमानंद तिरेले यांनी केले तर प्रस्थाविक नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी केले आशा चेचाने, निशांत बिसेन, वैशाली चौरागडे,धवल चौरागडे आदीनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी झाली