आदि भारत । तिरोड़ा (गोंदिया महाराष्ट्र)
तिरोडा शहरात एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे .ही घटना 22 नोव्हेंबर च्या रात्री दरम्यानची असल्याची माहिती देण्यात येत असून माझी आमदार दिलीप बनसोड यांच्या घराच्या समोरची असल्याची माहिती आहे.
तिरोडा- तालुक्यातील मेंढा येथील धर्मेंद्र उदापुरे यांचा आज 22 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजता दरम्यान झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या घरासमोर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र उदापुरे हे रस्त्याने जात असताना अचानक आलेल्या ट्रकखाली चिरडले गेले. धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचा अक्षरशः चुराडा झाला. व धर्मेंद्र यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.अपघाताची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रक व चालकाला तपास सुरू असून, पुढील तपास तिरोडा पोलिस करत आहेत.