गोरेगाव स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरेगावात पुन्हा एकदा राजकीय उष्णता चांगलीच वाढली आहे. भाजपचे अधिकृत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता गुरुकृपा लॉन गोरेगाव येथे भव्य जाहीर सभा व विजय संकल्प सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची जोरदार तयारी सुरू असून गोरेगाव शहरातील नागरिकांत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजपचे आवाहन "सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा!"
भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की,गोरेगावच्या विकासासाठी नगर पंचायतच्या निवडणुकीत उभे असलेले नगराध्यक्ष, नगरसेवक उमेदवार यांच्या विजयासाठी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता गुरुकृपा लॉन गोरेगाव मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.