आदि भारत । गोंदिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने या वर्षी घेण्यात आलेल्या भगवान बिरसा कला मंच या कलाविष्कार नृत्य व व्हिडिओ व्लोग या राज्य स्तरावरील स्पर्धा नुकत्याच नागपूर या ठिकाणी पार पडल्या, या मध्ये राज्य भरातून अनेक कलाकार व आदिवासी चित्रपट निर्माते यांनी सहभाग घेऊन आदिवासी कला, संस्कृती, याचे अनोखे कला कृतीचे साजरीकरण केले. यात मंच २०२५ मधे व्हिडिओ व्लोग विभागात महाराष्ट्र राज्य स्तरावर सालेकसा तालुक्यातील नानव्हा येथील शैलेंद्र मडावी ला प्रथम क्रमांकाचे 1 लाख 50 हजाराचे पारितोषिक मिळाले. सदर व्हिडिओ व्लोग सालेकसा तालुक्यातील कचारगड ह्या गोंड संस्कृती च्या देवस्थान वर बनवलेला आहे.