नमाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गिरविले आपत्ती व्यवस्थापनाचे धडेआदि भारत।गोंदिया महाराष्ट्र -

    आदि भारत।गोंदिया महाराष्ट्र - संकट काळात कसे वागले पाहिजे, संकटकालीन परिस्थितीवर मात कशी करायची, संकटकाळात न घाबरता हिमतीने कसे सामोरे जायचे, याबाबत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या वतीने येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना धडे देण्यात आले.
नटवरलाल माणिकराव दलाल महाविद्यालय गोंदिया येथील राष्ट्रीय कॅडेट कोर व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद (एन डी आर एफ नागपूर) यांच्या वतीने महाविद्यालयात आपत्कालीन  पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सुरक्षा बचाव या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. श्री रवींद्र मोहतुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोंदिया तालुका कार्यालयातील तहसीलदार धनंजय देशमुख तसेच नायब तहसीलदार पी. बी तिवारी, मानव्य विद्या शाखा प्रमुख डॉ. एच पी पारधी. डॉ . शशिकांत कडू, डॉ. सरिता उदापूरकर, डॉ. अश्विनी दलाल, डॉ. शशिकांत चवरे, डॉ. पी. नंदेश्वर डॉ मस्तान शाह, इत्यादी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त क्षेत्रातील लोकांना वाचविण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करून त्वरित मदत कशी देता येईल. या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल शाखा नागपूरचे टीम कमांडर ब्रिजेश यादव यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. त्याचप्रमाणे या पूरग्रस्त क्षेत्रात केली जाणारी मदत सुरक्षा व बचाव कार्य, महामार्गावर होणाऱ्या रासायनिक पदार्थाची गळती दरम्यान वर घ्यावयाची खबरदारी, अग्निसुरक्षा कार्यक्रम यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिरकरणाचे प्रमुख जाहिरउद्दीन शेख यांनी विशेष मार्गदर्शन केले. सोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. संकटकाळात न घाबरता, न डगमगता धैर्याने सामोरे गेल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येते, याबाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. योगेश भोयर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. तारेंद्र पटले, तसेच राष्ट्रीय कॅडेट कोर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.