आदि भारत। गोंदिया महाराष्ट्र
गोंदिया. खासदार प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वतीने स्थानिक धोटे बंधू महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या भक्ती भावात २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भगवान हनुमंत कथा पाठ व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्ट, पीठाधीश्वर सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या अमृत वाणीतून हनुमंत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्क्रमाच्या आयोजनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. आज १५ डिसेंबर रोजी हजारो धर्मप्रेमींच्या उपस्थिती तिरखेडी (सालेकसा) आश्रमाचे श्रीराम ज्ञानीराम महात्यागी महाराज यांच्या यांच्या शुभहस्ते व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा मोठ्या भक्ती भावात पार पडला याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यक्रमाची रुपरेखेची माहिती दिले तसेच हे धार्मिक कार्यक्रम शहर व जिल्ह्यातील धरप्रेमी साठी आहे त्यामुळे जनतेंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हनुमंत कथा पाठच्या माध्यमातून आपले धर्म जीवन साफल्य करावे असे विनंती पूर्व आवाहन केले.
२१ डिसेंबर ला दुपारी १.३० वाजता सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभा यात्रा माँ जगदंबा दुर्गा मंदिर, दुर्गा चौक पासून श्री हनुमान मंदिर सिविल लाईन येथे समापन होईल. दुपारी ३.३० ते ६ पर्यंत हनुमंत कथाचा आयोजन, रात ८ वाजता अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन धोटे बंधू महाविद्यालयात करण्यात आले आहे यात देशातील नामवंत व प्रसिद्ध कवि (कवि दिनेश बावराजी, कवि चिराग जैनजी, कवि कविता तिवारीजी, कवि मनू वैशालीजी, कवि निकुंज शर्माजी) यांचा समावेश आहे. २२ डिसेंबर ला एन.एम.डी महाविद्यालय येथे दुपारी १२ ते ०२ वाजता पर्यत विद्यार्थी व युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याकरिता युथ फेस्टिवलचे आयोजन व दुपारी ३.३० ते ६ पर्यत हनुमंत कथा आयोजन, रात्री ८ वाजता खासदार श्री प्रफुल पटेल यांचे निवासस्थान, रामनगर येथे अहमदाबाद येथील प्रसिद्ध श्री धवन मानस द्वारा प्रस्तुत सुंदरकांड चे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर ला दुपारी १ ते २ पर्यंत भक्तगणांना भेट, दुपारी ३.३० ते ६ पर्यंत हनुमंत कथा सायंकाळी ७.३० वाजता कोरणी घाट येथे भव्य धार्मिक व भक्तिमय वातावरणात सद्गुरु श्री गुरूजी यांच्या हस्ते दिप दान महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना खासदार श्री प्रफुल पटेल, सौ वर्षाताई पटेल व भक्तगण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती कार्यक्रमाचे संचालन व योग्य नियोजन करीत असून या हनुमंत कथा व विविध हृदयस्पर्शी व धार्मिक कार्यक्रमांना सर्वांचा सहभाग लाभावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी आयोजकांच्या वतीने केले.