आदि भारत । गोरेगांव गोंदिया
ग्राम उत्सव समिती पिंडकेपार च्या वतीने श्रीकृष्ण कथेचे आयोजन 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे .ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नसेल अशा लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्यात येतील. त्याचप्रमाणे निशुल्क आरोग्य तपासणी करून आवश्यक लाभार्थ्यांना मोफत उपचार ची सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे. आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार असून यावर्षी ची श्रीकृष्ण कथा भाविकांसाठी एक धार्मिक महोत्सव म्हणून ठरणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की या धार्मिक महोत्सवाला यशस्वी करून श्रीकृष्ण कथा श्रवण करावे. असे आव्हान ग्राम उत्सव समिती पिंडकेपारच्या वतीने करण्यात आले आहे.