बदलत्या पत्रकारितेतही प्रिंट मीडियाचे अढळ स्थान
प्रेस क्लब गोंदियातर्फे आयोजित पत्रकारदिन कार्यक्रमात मान्यवरांमधला सूर
गोंदिया : आधुनिकतेच्या या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पटकन बातम्या आपल्याला वाचता येत असल्या तरी त्यातली सत्यता तपासून पाहिल्याशिवाय त्या बातम्या खऱ्या मानल्या जात नाही. प्रिंट मीडियात प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आधार घेतला जातोय. त्यामुळे काळ बदलला असला तरी प्रिंट मीडियाचे स्थान अढळ आहे असा सूर मान्यवरांतून उमटला.
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी ( ता. ६) येथील राईस मिल असोसिएशनच्या सभागृहात पत्रकार दिन कार्यक्रम व जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरवात मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे -निमसरकर होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेंडे, सालेकसाचे नगराध्यक्ष विजय फुंडे, गोरेगावचे नगराध्यक्ष तेजराम बिसेन, गोंदियाचे नगरसेवक अभय अग्रवाल, तिरोड्याचे नगरसेवक देवेंद्र तिवारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, प्रेस क्लबचे अध्यक्ष हिदायत शेख, संयोजक संतोष शर्मा, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेंडे, विजय फुंडे, तेजराम बिसेन, नगरसेवक अभय अग्रवाल, देवेंद्र तिवारी यांचा शाल , श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यात महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सुपर वूमन संघटना व वृत्तपत्र विक्रेता संघाचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार राजेंद्र जैन यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत आम्ही जरी एकमेकांविरुद्ध लढलो असलो तरी आम्हा सर्वांना एका व्यासपीठावर आणून विरोधकांना एकत्र घेऊन येण्याची शक्ती केवळ पत्रकारांमध्ये असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सांगितले. प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे संयोजक संतोष शर्मा यांनी प्रेस क्लबचे ध्येय धोरण विषद करून प्रेस क्लबच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष सावन डोये व सहसंयोजक देवेंद्र रहांगडाले यांनी केले. उपस्थितांचे आभार क्लबचे सचिव प्रमोद नागनाथे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समन्वयक भरत घासले, सहसंयोजक देवेन्द्र रहांगडाले, रविन्द्र तुरकर , कार्यकारीणी सदस्य मुनेश्वर कुकडे, दिलीपसिंह लिल्हारे, अनिल मदनकर, राकेश रामटेके, शाहिद पठाण, दुर्गेश येल्ले, प्रमोद गुडधे, शुभम ढोमणे, प्रदिप वऱ्हाडे, अरविंद राऊत, राजा चंद्रिकापूरे, मोरेश्वर वाढई, इरशाद छवारे, संदिप बिसेन, अर्चना गिरी
आदींनी सहकार्य केले.
.....